MNS Protest : खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक; आयुक्त दालनासमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले असल्याने त्याविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेत आज (शुक्रवारी) आंदोलन केले.(MNS Protest) महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या दालनासमोर आंदोलन करत खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी केली.  

शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली  झालेल्या आंदोलनात राजू साळवे, रुपेश पटेकर आदी पदाधिकारी, मनसैनिक सहभागी झाले होते. शहरातील विविध भागातील रस्त्यांवर 3 हजार 773 खड्डे होते. यापैकी 3 हजार 382 म्हणजे 90 टक्के खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे.(MNS Protest) मात्र, त्यानंतरही शहरातील विविध भागात आजही मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. सणासुदीचा काळ आहे. नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. पण, रस्त्यांवरील खड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने 15 ऑक्टोबरनंतरच खड्डे बुजविण्याचे काम हाती घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

savai gandharv mahotsav : यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १४ ते १८ डिसेंबर दरम्यान

त्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेत खड्यांविरोधात आंदोलन केले. शहरातील रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजविण्याचे काम हाती घेण्याची मागणी आंदोलनातून केली.

या आंदोलनात शहर अध्यक्ष सचिन चिखले, अश्विनी बांगर, राजू सावळे, विशाल मानकरी, रुपेश पटेकर, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी,सीमा बेलापूरकर, श्रद्धा देशमुख, अनिता पांचाळ, नितीन चव्हाण, अलेक्स अप्पा मोझेस, सुरेश सकट, नितीन सूर्यवंशी, नारायण पठारे, कृष्णा महाजन, शिशिर महाबलेश्वरकर, गणेश अवघडे, आकाश पांचाळ, विशाल साळुंके, दुर्गे कैलास, वैशाली बोत्रे, विद्या कुलकर्णी, पंकज चपटे सहभागी झाले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.