Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; नागरिकांना 17 मार्च पर्यंत हरकती, सूचना करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी सार्वजनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 14 प्रभाग करण्यात आले असून प्रभाग रचनेवर नागरिकांनी हरकती आणि सूचना करण्याचे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. 17 मार्च (गुरुवार) पर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत. प्रभाग रचना जाहीर होताच इच्छुकांनी धावपळ सुरू केली आहे, तर काहींना ही प्रभाग रचना मान्य नसल्याने हरकती नोंदवण्याची तयारी केली आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना गुरुवारी (दि. 10) रोजी जाहीर करण्यात आली असून त्यावर हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम तारीख 17 मार्च आहे.

आगामी 2022 च्या सार्वजनिक निवडणुकीकरिता नगरपरिषदेची एकूण 14 प्रभाग जाहीर करण्यात आलेले आहे. या प्रकटीकरणात प्रभागाची व्याप्ती, त्यातील महत्त्वाची ठिकाणे, परिसर, तसेच प्रत्येक प्रभागाच्या सीमा, मतदारांची संख्या आदी बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 11 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रशासनाने गुरुवार (दि.10) रोजी प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिद्ध केलेले असून त्यावरील हरकती-सूचना सादर करण्याचा कालावधी दि.10 मार्च ते गुरुवार दि 17 मार्च 2022 पर्यंत ठेवण्यात आलेला आहे. या प्रभागाबाबतच्या हरकती व सूचना मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या मुदतीत दाखल कराव्यात असे या प्रकटीकरण पत्रकात म्हटले आहे. हरकती व सूचना दाखल करणार्‍या नागरिकांना सुनावणी करताना उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. असे प्रकटीकरण यामध्ये नमूद केले आहे.

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत एकूण 14 प्रभाग निश्चित करण्यात आलेले असून या प्रभागाची सुरुवात तळेगाव स्टेशन वरील यशवंनगर पासून केलेली असून अखेरचा 14 क्रमांकाचा प्रभाग हा गाव विभागातील राव कॉलनी, तुकारामनगर, पोलिस स्टेशन पर्यंत आहे.

कार्यालयीन वेळेत नगर परिषदेत परिषद कार्यालयाच्या बोर्डवर तसेच नगरपरिषदेच्या वेबसाईड तसेच प्रसार माध्यमावर प्रभागरचना जाहीर होताच राजकीय पक्ष, पक्षातील इच्छुक यांनी यासाठी बारकाईने पाहणी केली. या प्रभाग रचनेवर उलट-सुलट चर्चेला उधाण आले. तर अनेक इच्छुकांनी या प्रभाग रचनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून हरकती व सूचनाची तयारी सुरू केलेली आहे.

काऊंटडाऊन दहावी! भाग 10 – Tricks to score higher in SSC English Exam – Santosh Khatal. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या प्रारुप प्रभाग रचनेत त्या प्रभागाची एकूण लोकसंख्या त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही नमूद करण्यात आलेली आहे. प्रभाग रचना जाहीर होताच इच्छुकांमध्ये हालचालींना वेग आला असून आपणास कोणता प्रभाग सोयीचा आहे याबाबत चिंतन सुरू झाले आहे. तसेच मतदार याद्या व निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.