India Corona Update : चोवीस तासांत नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक  

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशात नव्यानं वाढ झालेल्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. चोवीस तासांत 2 लाख 51 हजार 209 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 3 लाख 47 हजार 443 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 15.88 टक्के एवढा झाला आहे. 

देशातील कोरोना व ओमायक्रॉनची सद्यस्थिती जाणून घेऊया दहा मुद्यांमध्ये. 

1. देशात सध्या 21.05 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

2. गेल्या 24 तासांत 627 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

3. ICMR च्या आकडेवारीनुसार आजवर देशात 72.37 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 15.82 लाख चाचण्या पार पडल्या.

4. देशाचा रिकव्हरी रेट 93.60 टक्के एवढा झाला आहे.

5. देशाचा आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट 17.47 टक्के एवढा आहे.

6. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत 164.44 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

7. देशात आजवर 4 लाख 92 हजार 327 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

8. सध्या महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

9. जानेवारी 2022 मध्ये 9,672 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये 1,292 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली होती.
10.देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 19.5 टक्क्यांवरुन 15.8 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.