Talegaon News : छेडछाडीची तक्रार केल्याने डोक्यात हातोडीने घाव घालत अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज – पोलीस ठाण्यात छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या डोक्यात हातोडीने घाव घालत तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 27) सायंकाळी साडे सहा ते सात वाजताच्या कालावधीत बाजार गल्ली रोड, तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी जखमी सतरा वर्षीय मुलीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवम विनोद शेळके (वय 20, रा. यशवंत नगर, तळेगाव दाभाडे) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सतरा वर्षीय मुलीने आरोपी शिवम शेळके याच्या विरोधात छेडछाडीची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या रागातून शेळके याने मी तुला जिवंत सोडत नाही तुला खल्लास करतो, असे म्हणत त्याच्याकडे असलेल्या हातोड्याने फिर्यादीच्या डोक्यात अनेक घाव घालून प्राणघातक हल्ला केला. यामध्ये फिर्यादी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.