Moshi : अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या माथेफिरूला अटक

एमपीसी न्यूज : 11 वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकऱणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी (Moshi) एका माथेफिरूला अटक केली आहे. हा सारा प्रकार सोमवारी (दि.11) मोशी येथे घडला आहे.

याप्रकरणी महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी अक्षय उर्फ टकल्या सुधाकर गायकवाड (वय 26 रा.मोशी) या आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 11 वर्षीय मुलगी किराणा समान घेऊन घरी येत होती. यावेळी आरोपीने तिला अडवून तिचा हात पकडत तिच्याशी गैरवर्तन केले. या आधीही त्याने पीडितेला असाच त्रास दिला होता.

फिर्यादीच्यां नणंद त्याल जाब विचारण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत जिवे (Moshi) मारण्याची धमकी दिली. यावरून भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.