Pimpri : शैक्षणिक साहित्यासाठी विद्यार्थ्यांचे महापालिकेसमोर आंदोलन 

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपातील दिरंगाईसह विविध मागण्यांसाठी समता सैनिक दलाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रवेशद्वारासमोर आज (गुरुवारी) “जबाब दो’ आंदोलन करण्यात आले. 

महापालिका शाळेतील विद्यार्थी, पिंपरी-चिंचवड पालक व विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी देखील या आंदोलनात सहभागी झाले होते.

महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वेळेवर का मिळत नाही, शिक्षणाचा दर्जा का सुधारत नाही, महापालिका शाळेत शासन, प्रशासन, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची मुले का नाहीत, आदी प्रश्‍न आंदोलनाच्या माध्यमातून विचारण्यात आले. ढोल वाजवत महापालिका प्रशासनाचे या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यात आले. हातात विविध प्रश्‍नांचे फलक घेतलेले शालेय गणवेशातील विद्यार्थी लक्ष वेधत होते. सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.