Pune News : महापालिका आयुक्त 22 फेब्रुवारीला मांडणार अंदाजपत्रक

एमपीसी न्यूज – महापालिका आयुक्तांना येत्या 22 फेब्रुवारीला सकाळी साडेअकरा वाजता पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मांडण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, महापालिका अधिनियम कलम 95 नुसार महापालिकेचे महसूली, भांडवली इत्यादी उत्पन्न आणि खर्चाच्या अंदाजपत्रकाचा आराखडा आयुक्तांनी दरवर्षी 15 जानेवारीपूर्वी स्थायी समितीला सादर करणे आवश्यक असते. या वर्षी सार्वत्रिक निवडणूक कामकाज असल्यामुळे 22 फेब्रुवारीला अंदाजपत्रक मांडण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाने ठेवला होता. स्थायी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.