Pune : महापालिकेतर्फे उद्या 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज – ऐन परीक्षेच्या तोंडावर ताण, मग त्यापासूनची भीती आणि परीक्षेच्या काळातच गोंधळून जाणे, यावर उपाय म्हणून खास 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे महापालिकेच्या वतीने मार्गदर्शन व्याख्यानमाला आयोजित केली आहे. सोमवारी (दि. 24 फेब्रुवारी) रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या वेळेत गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे हा कार्यक्रम होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला कसे सामोरे जायचे ? या विषयावर काही टिप्स दिल्या जातील.
व्याख्यानमालेचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे विद्यापीठचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएससी बोर्डच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांच्या हस्ते होणार आहे. उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, व्याख्यानमालेचे संयोजक, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसेचे गटनेते वसंत मोरे, आरपीआय (आठवले गट) गटनेत्या सुनीता वाडेकर, एमआयएमच्या गटनेत्या सोनाली लांडगे, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

ही व्याख्यानमाला सर्वांसाठी मोफत असून डॉ. स्नेहा जोशी (मराठी), डॉ. उमेश प्रधान (इंग्रजी), डॉ. जयश्री अत्रे (गणित), डॉ. अ. देशमुख (विज्ञान), शिवानी लिमये (समाजशास्त्र), अनिल गुंजाळ (परीक्षेला जाता – जाता ) ही तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सभागृह नेते धीरज घाटे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.