Pimpri News : महापालिका ‘जीआयएस’द्वारे करणार मालमत्तांचे सर्वेक्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील सर्व मालमत्तांचे ‘जीआयएस’ (भौगोलिक माहिती प्रणाली / Geographical Information System) द्वारे सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत जीआयएस प्रणालीचे नागरिकांना भविष्यातील होणारे फायदे लक्षात घेवून ही प्रणाली राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग व पारदर्शक प्रशासन, जीआयएस प्रणालीद्वारे महापालिका क्षेत्रामधील मिळकतीसाठी सुधारीत सेवा, जीआयएस प्रणालीद्वारे संसाधनांचे सुधारित नियोजन, जीआयएस प्रणालीद्वारे नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे.

या सर्वेक्षणासाठी शहरातील मालमत्तांचे फोटो व इतर आवश्यक माहिती संकलित करण्यासाठी अॅटॉस इंडिया प्रा.लि. यांचे मार्फत नियुक्त केलेले सर्व्हेअर / कर्मचारी (ओळखपत्रासह) यांची नेमणूक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता केली आहे. त्यांना आवश्यक माहिती तसेच मालमत्ता कर पावती, आधार कार्ड, वीज बिल आदी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्यास मदत करावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.