Pune News : आंबील ओढा परिसरात पाठलाग करून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज : रस्त्याने पायी चाललेल्या एका तरुणाचा पाठलाग करुन त्याच्यावर चाकूने वार करुन दोघांनी खून केला आहे. ही घटना काल रात्री सव्वा बाराच्या सुमारास आंबिल ओढ्याजवळ मांगिरबाबा चौकात घडली. खूनाचे कारण स्पष्ट नसून याप्रकरणी दोघाजणांविरुद्ध दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज भालचंद्र यशवद (वय 23, रा. राजेंद्रनगर)  असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज काल रात्री बाराच्या सुमारास आंबिल ओढा परिसरातून रस्त्याने पायी चालला होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दोघा जणांनी त्याला अडविले. त्यानंतर दोघांनी सूरजवर अचानक चावूâने वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर दोघे आरोपी पसार झाले. घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन सूरजला ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान आज पहाटे सूरजचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.