Maharashtra Bandh : शहरात महाराष्ट्र बंद यशस्वी; महाविकास आघाडीचा दावा

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेश येथील लखीमपुरच्या शेतकरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला आज (सोमवार) चा महाराष्ट्र बंद नागरिकांच्या पाठिंब्यामुळे यशस्वी झाल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.

उत्तर प्रदेश लखीमपूर येथे शेतकरी आंदोलकांवर भाजपच्या केंद्रीय मंत्री पुत्राने धावते वाहन घालून काही शेतक-यांना चिरडून ठार केले. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सोमवार ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि समविचारी पक्षांनी एकत्र येऊन पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात धरणे आंदोलन केले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, शिवसेना शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, विलास लांडे, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटीका अॅड. उर्मिला काळभोर, नगरसेवक अजित गव्हाणे, डब्बू आसवाणी, डॉ. वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, निकीता कदम, संगिता ताम्हाणे, सुमन पवळे उपस्थित होते.

तसेच माजी नगरसेविका शमीम पठाण, प्रशांत शितोळे, अरुण बो-हाडे, मारुती भापकर, जगदीश शेट्टी, सनी ओव्हाळ, प्रसाद शेट्टी, तानाजी खाडे, विजय कापसे, रमा ओव्हाळ तसेच विजय लोखंडे, फजल शेख, नरेंद्र बनसोडे, अनिल रोहम, अशोक मोरे, राजेंद्रसिंह वालिया, डॉ. वसीम इनामदार, नीरज कडू, वैशाली मराठे, अनुजा कुमार, उमेश खंदारे, तारीक रिझवी, सौरभ शिंदे, शाकीब खान, संदीप जाधव आदी उपस्थित होते.

व्यापारी, लघुउद्योजक, कामगार, शेतकरी या सर्वांनी हा बंद यशस्वी केला. समाजातील हे सर्व घटक केंद्रातील भाजपा सरकारच्या धोरणांमुळे चिडून आहेत. इंधन दरवाढ त्यामुळे महागाई आणि वाढती बेरोजगारी यामुळे केंद्र सरकार विरुध्द सर्वत्र राग आहे. याचा उद्रेक म्हणून सोमवारी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला असा दावा वाघेरे यांनी केला.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरुध्द घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. तसेच माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, अरुण बो-हाडे, तानाजी खाडे तसेच कामगार नेते अनिल रोहम आदींनीही केंद्र सरकारचा निषेध करणारे भाषण केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.