Pimpri News: शहराला फेसबुक आणि ट्विटरवर स्वतंत्र ओळख द्या – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र ओळख द्यावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. फेसबुक आणि ट्विटरच्या भारतातील कार्यालयाकडे मागणी पत्र दिले आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, फेसबुक, ट्विटर ही सोशल मीडिया माध्यमे संपूर्ण जगभरात कमालीची लोकप्रिय आहेत. त्याचा वापर नागरिक दैनंदिन जीवनात करत असतात. परंतु, शेजारील पुणे शहराप्रमाणे फेसबुक आणि ट्विटरवर ‘पिंपरी-चिंचवड’ शहराला स्वतंत्र मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे येथील अनेक नागरिक लोकेशन निवडताना पुणे निवडतात किंवा पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, सांगवी अशी भागांची/गावांची नावे निवडतात. शहराचा अभिमान असणाऱ्या नागरिकांना ही बाब खटकते.

गुगल मॅप्सने पिंपरी-चिंचवड शहराला वेगळी मान्यता दिली आहे. गुगल मॅप्स वरील ठिकाणाचा पत्ता वाचला तर सर्वात शेवटी ते पुणे ऐवजी शहराचे नाव ‘पिंपरी-चिंचवड’ असे देतात. ही गोष्ट स्वागतार्ह आहे. गुगल प्रमाणे शहराची वेगळी ओळख प्रस्थापित करून फेसबुक, ट्विटरने येथील नागरिकांच्या भावनेचा सन्मान करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.