Nagpur : कुणबी नोंदी संबंधित न्या. संदिप शिंदे समितीचा दुसरा अहवाल सादर; अहवाल मुख्यमंत्री सभागृहात मांडणार

एमपीसी न्यूज – राज्यात कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या (Nagpur) नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने आपला दुसरा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज सुपूर्द केला असून, मुख्यमंत्री हा अहवाल राज्याच्या सभागृहात मांडणार आहेत. याबाबत त्यांनी पत्रकार परिषेदेत माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते.

राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी – मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्यासाठी व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्या. संदीप शिंदे (निवृत्त) समितीने तयार केलेला दुसरा अहवाल आज न्या. शिंदे यांनी विधिमंडळ प्रांगणातील कक्षात राज्य शासनास सादर केला. यापूर्वी न्या शिंदे समितीचा पहिला अहवाल 31 ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला होता.

TDR : पिंपरी महापालिकेतील टीडीआर घोटाळ्याची ‘ईडी’ कडे तक्रार

मराठा कुणबी नोंदी असलेल्या अहवालात आतापर्यंत मिळालेल्या कुणबी नोंदीबाबत माहिती दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्पातील हा अहवाल असून कुणबी नोदींची (Nagpur) अधिकृत माहिती एकनाथ शिंदे सभागृहामध्ये सांगणार आहेत. न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल सरकारकडे दिला गेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.