Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात आणखी 15 ठिकाणी नाकाबंदी वाढवली; पाच पॉईंटवरील वाहतूक पूर्णतः बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला संक्रमित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे शहरात जमावबंदी आणि संचारबंदी आणखी कठोर करण्यात येत आहे. कोणालाही शहरातून बाहेर अथवा बाहेरून शहरात प्रवेश करता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातून बाहेर जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी वाढवली आहे. 10 ठिकाणी नाकाबंदी तर पाच ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आले आहेत.

महापालिका आयुक्तांनी रविवारी रात्री पिंपरी चिंचवड शहराला संक्रमित क्षेत्र म्हणून घोषित करणारा आदेश काढला. रविवारी (दि. 19) रात्री 12 ते 27 एप्रिल रात्री 12 पर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. या आदेशानुसार पोलिसांनी दिलेले पास 22 एप्रिल पर्यंत चालणार आहेत.

पोलिसांनी देखील नाकाबंदीत वाढ केली आहे. नवीन 10 पॉइंटवर नाकाबंदी लावण्यात आली असून प्रत्येक पॉईंटवर एक अधिकारी, पोलीस ठाण्यात तीन कर्मचारी आणि वाहतूक विभागाचे दोन कर्मचारी असा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची वाहतूक सुरू राहणार असून त्याचेही रेकॉर्ड नाकाबंदी दरम्यान ठेवले जाणार आहे.

नाकाबंदीचे होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग

नाकाबंदी दरम्यान पोलीस ज्या वाहनांना, नागरिकांना तपासतील त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. तसेच यावेळी नागरिकांची चौकशी करताना पोलिसांनी योग्य अंतर ठेवावे, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. अलगीकरण आणि विलगिकरणात ठेवलेले नागरिक बाहेर फिरताना आढळल्यास तात्काळ त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवले जाणार आहे.

नाकाबंदीचे नवीन पॉईंट

हिंजवडी पोलीस स्टेशन

# बावधन खंडोबा मंदिर (पुणे महापालिका हद्द)
# इंडियन ऑइल जंक्शन
# भूमकर चौक

# ताथवडे अंडरपास
# पुनावळे अंडरपास

# शनी मंदिर, अक्षरा शाळेजवळ (कायमस्वरूपी बंद)

भोसरी पोलीस स्टेशन

# मोशी चिंबळी ब्रिज

# दापोडी बोपोडी ब्रिज, भाऊ पाटील रोड (कायमस्वरूपी बंद)

# जुना पुणे नाशिक महामार्ग, इंद्रायणी ब्रिज (कायमस्वरूपी बंद)

दिघी पोलीस स्टेशन

# च-होली-निरगुडी रस्ता
# च-होली-धानोरी फाटा
# देहूफाटा
# गाथा मंदिर ब्रिज (कायमस्वरूपी बंद)

# चाकण चौक, आळंदी (कायमस्वरूपी बंद)

देहूरोड पोलीस स्टेशन

# कॅनबे चौक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.