Movie on Sushant: सुशांतच्या जीवनावर आधारित चित्रपटात ‘हा’ साकारणार ‘नेपोकिंग’

'Napoking' to be made into a film based on Sushant sing's life आज इंडस्ट्रीमध्ये जी बाहेरुन मुले येतात. त्या मुलांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये तयार झालेल्या गँगमुळे योग्य ती संधी मिळत नाही. या गँगला मी तोडू इच्छितो.

एमपीसी न्यूज – युवा अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये अनेक वाद उफाळून आले. बरेच तर्कवितर्क झाले. आरोप प्रत्यारोप झाले. अजूनही त्याच्या आत्महत्येचे ठोस कारण कळले नाही. बॉलिवूडमधील गट-तट यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले. येथील काळी बाजू अनेकांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यात आतले बाहेरचे, घराणेशाही असे वाद रंगले. अजूनही दररोज नवनवीन आरोप होतच आहेत.

सुशांतच्या निधनानंतर त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपट निर्माते विजय शेखर गुप्ता या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘सुसाइड ऑर मर्डर’ असे ठेवण्यात आले आहे.

या चित्रपटात टिक-टॉक स्टार आणि सुशांतचा लुक अलाइक सचिन तवारी सुशांतच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मॉडेल राणा एका चित्रपट निर्मात्याची भूमिका साकारणार आहे. या निर्मात्याला चित्रपटात नेपोकिंग असे म्हटले आहे.

VSG Binge यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटासंबंधी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मॉडेल राणा ‘सुसाइड ऑर मर्डर’ या चित्रपटात एका चित्रपट निर्मात्याची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले आहे.

‘तो एक मोठा चित्रपट निर्माता आहे. पण तो फक्त स्टार किड्सला लाँच करतो. मॉडेल राणा Nepoking ची चित्रपटात भूमिका साकारणार आहे’ असे त्यांनी म्हटले आहे. सध्या त्याचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

यापूर्वी या चित्रपटात उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये राहणारा टिकटॉक स्टार सचिन तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले होते. हा चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. तसेच हे पोस्टर प्रदर्शित करत विजय शेखर गुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी चित्रपटात कोणत्या गोष्टी अधोरेखित करण्यात आल्या आहेत हे सांगितले होते.

‘मी हा चित्रपट यासाठी करतोय जेणेकरुन मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे मोठे स्टार्स आणि प्रॉडक्शन हाउसची एकाधिकारशाही आहे, ती संपवली पाहिजे या हेतूने मी हा चित्रपट बनवत आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.

‘आज इंडस्ट्रीमध्ये जी बाहेरुन मुले येतात. त्या मुलांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये तयार झालेल्या गँगमुळे योग्य ती संधी मिळत नाही. या गँगला मी तोडू इच्छितो. माझ्या कथेमध्ये ते सगळं असणार आहे, जे सुशांतसोबत घडले आहे. त्या मुलाला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले. त्याच्याकडून एकापाठोपाठ एक चित्रपट काढून घेण्यात आले’ असे त्यांनी पुढे म्हटले होते.

या चित्रपटात सुशांतचा जीवन प्रवास दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.