Spiderman Video: लोकजागृतीसाठी कोलकाता पोलिसांची अनोखी शक्कल

Spiderman Video: Kolkata Police's unique approach to public awareness स्पायडरमॅन म्हणजे हातातली जाळी फेकत उंचच उंच इमारतींवरुन उड्या मारणारा एक सुपरहिरो आपल्या डोळ्यांसमोर येतो. मात्र या व्हिडिओमधील स्पायडरमॅन लॉकडाउनमुळे चक्क...

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संसर्गाने सध्या सगळ्यांनाच लॉकडाऊन केले आहे. कामाशिवाय घराबाहेर पडू नका असे प्रत्येकजण कळकळीने सांगत आहे. तरीदेखील काही महाभाग असे असतातच की, जे मजा म्हणून घराबाहेर भटकत असतात. मात्र त्यांच्यामुळे साथ आटोक्यात यायला अटकावच होतो.

आतापर्यंत लाखो लोकांना या कोरोनाची लागण झाली आहे. यात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. परंतु, या विषाणूवर मात करणारी कुठलीही अधिकृत लस अद्याप तयार झालेली नाही. मात्र या धोकादायक परिस्थितीत विनाकारण घराबाहेर पडणा-या मंडळींना जागृत करण्यासाठी कोलकाता पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी स्पायडरमॅनचा एक गंमतीशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे.


स्पायडरमॅन म्हणजे हातातली जाळी फेकत उंचच उंच इमारतींवरुन उड्या मारणारा एक सुपरहिरो आपल्या डोळ्यांसमोर येतो. मात्र या व्हिडिओमधील स्पायडरमॅन लॉकडाउनमुळे चक्क लिफ्टमधून प्रवास करताना दिसतोय.

पोलिसांच्या भीतीमुळे तो बाहेर जाऊन उडू शकत नाही. या गंमतीशीर व्हिडिओमार्फत पोलिसांनी नागरिकांना घरातच थांबण्याचा सल्ला दिला आहे. हा आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.