Sharad Pawar : चाकण मध्ये मराठी कमी; भैय्यांची संख्या अधिक – शरद पवार

एमपीसी न्यूज –  खेड तालुक्याचा चेहरा औद्योगिकरण झाल्याने बदलला आहे. पूर्वी चार माणसातील दोन माणसे ओळखीची असायची आता मात्र तशी स्थिती राहिली नसल्याची खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वाफगाव येथे शनिवारी (दि. 11 जून) रोजी बोलून दाखवली. चाकण मध्ये सध्या मराठी माणसे कमी आणि भैय्ये अधिक दिसत असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी म्हटले.

वाफगाव (ता.खेड, जि.पुणे ) येथील भुईकोट किल्ल्यांमध्ये असणार्‍या रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय हे दुसऱ्या जागेत स्थलांतर व्हावे तसेच होळकरांचा भुईकोट किल्ल्याचे जतन व्हावे, दुर्लक्षित स्मारक हे मोठे पर्यटन स्थळ व्हावे अशी मागणी होळकर यांचे वंशज भूषण सिंह राजे होळकर यांची होती. त्यांच्या मागणीला सुद्धा शनिवारी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी हिरवा कंदील दाखवला.

याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शरद पवार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील तसेच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील  तसेच आमदार रोहित पवार, आमदार दिलीप मोहिते उपस्थित होते.

MP Dhananjay Mahadik : “भाऊ, तुमच्यामुळे मी परत खासदार झालो”; नवनिर्वाचित भाजप खासदार धनंजय महाडीक गहिवरले

कार्यक्रमप्रसंगी शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, वाफगाव येथील भुईकोट किल्ल्यांमध्ये असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या  विद्यालयाला पर्यायी जागा शोधून तेथे विद्यालय बांधण्यात यावे. विद्यालयाला म्हणजे रयत शिक्षण संस्थेला पाच सहा एकर जागा मिळवून देण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे व येणाऱ्या पुढील काळात वाफगाव येथील भुईकोट किल्ला उच्च दर्जाचे पर्यटन स्थळ व्हावे असे म्हणून पवार यांनी आपली संमती दर्शवली.

दरम्यान, उच्च दर्जाच्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच महाराष्ट्रात होळकरांचे स्मारक जतन होईल. होळकरांचा भुईकोट किल्ला हा पर्यटनासाठी खुला करण्यात येईल असे सुद्धा पवार यांनी बोलताना स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या वेळी रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, परिसरातील गावातील सरपंच, उपसरपंच, विविध सहकारी सोसायटीचे पदाधिकारी, महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयचे सर्व शिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाणी समस्येवर तोडगा; कळमोडी बाबत सकारात्मक प्रतिसाद

महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान व होळकर घराण्याच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या खेड तालुक्यातील वाफगाव येथील होळकर वाड्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी 11 जून रोजी भेट दिली. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते, रोहित पवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात आमदार मोहिते यांनी खेड तालुक्याला कळमोडीचे पाणी देण्याबाबत विषय छेडला. शरद पवार यांनी याच कार्यक्रमात यावर तोडगा काढून उपस्थितांची मने जिंकली.

चाकण मध्ये मराठी कमी भैय्ये अधिक ; शरद पवार (Sharad Pawar)

खेड तालुक्याचा चेहरा औद्योगिकरण झाल्याने बदलला आहे. पूर्वी चार माणसातील दोन माणसे ओळखीची असायची आता मात्र तशी स्थिती राहिली नसल्याची खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाफगाव येथे  बोलून दाखवली. चाकण मध्ये सध्या मराठी माणसे कमी आणि भैय्ये अधिक दिसत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.