Pune News : राष्ट्रवादीतर्फे भोसरीत जश्ने ईद-ए-मिलन कार्यक्रम; शरद पवारांची प्रमुख उपस्थिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा जश्ने ईद-ए-मिलन कार्यक्रम आज (बुधवारी) पार पडला. भोसरी लांडेवाडीतील राजमाता जिजाऊ कॉलेजच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती, तर राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमप्रसंगी आमदार अण्णा बनसोडे, केरळचे आमदार के. थॉमस, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, भोसरीचे माजी आमदार  विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, संजोग वाघेरे, मंगला कदम, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मोहंमद पानसरे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, राहुल भोसले, फजल शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष श्याम लांडे, चिंचवडचे विनोद नढे, भोसरीचे पंकज भालेकर, माजी नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, पक्षाचे सर्व माजी महापौर, माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

याप्रसंगी बोलताना शरद पवार नेमकं काय म्हणाले –

  • पिंपरी चिंचवड मिनी इंडिया आहे. त्याचे प्रदर्शन ईद मिलनच्या माध्यमातून आयोजित केले आहे.
  • कोणतीही धर्म कोणाचा द्वेष करा असे सांगत नाही. धर्म बंधुभाव, विकास सांगतो, ईदच्या निमित्ताने एकवाक्यता निर्माण करण्याचे आपले कर्तव्य आहे.
  • देशात वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न काही शक्तीकडून होत आहे.
  • काश्मीर फाइल हा काय प्रकार आहे? काश्मीर हा भारताचा भाग आहे. पण, शेजारच्या देशाला मान्य नाही. काश्मीरमधील हिंदू, मुस्लिम यांच्यावर ज्या काळात हल्ले झाले. त्याकाळी देशात, राज्यात भाजपच्या पाठिंबाच्या सरकार होते.
  • चित्रपट काढून संघर्षाचे वातावरण निर्माण केले जात आहे.
  • महाराष्ट्र शिवाजी महाराजांनी राज्य प्रस्थापित केले. महाराज यांचे राज्य भोसले यांचे नव्हे तर हिंदवी, रयतेचे राज्य म्हणून ओळखले जाते
  • काही लोक जात-धर्माच्या माध्यमातून विद्वेष वाढविण्याचे काम करतात. आम्हाला विद्वेष नको, विकास, रोजगार पाहिजे.
  • हा सोहळा आयोजित करून शहर राष्ट्रवादीने ऐक्याचे दर्शन घडविले.
  • राज्य देश विकासात आणखी कसा पुढे नेत येईल याचा सर्वांनी यानिमित्ताने विचार करून काम करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.