NCP : पर्यावरण सेलच्या वतीने 75 वृक्षांची लागवड

एमपीसी न्यूज : आज 14 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त 75 वृक्ष लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पर्यावरण सेल पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्या वतीने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पर्यावरण सेलच्या सरचिटणीस प्रवक्त्या ज्योती जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस – पर्यावरण सेलचे अध्यक्ष विनय शिंदे, संघटक नारायणराव बहिरवडे, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष सुनील कदम, शैलेश बापू मोरे, उप शहर प्रमुख (शिवसेना) वाणी सर, दिपक पाटील, विजय सुरवसे,  भटू पाटील,  गणेश कळोरे , बेनके साहेब, गाडे काका, जया गायकवाड इ. महिला व जेष्ठ नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

तसेच श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, शिवशाही प्रतिष्ठान, पुर्णानगर विकास कृती समिती, बॅडमिंटन गृप, जेष्ठ नागरिक संघ पुर्णानगर, जेष्ठ नागरिक संघ संभाजी नगर इ.चे सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.