Maval Corona Update : मावळ तालुक्यात मंगळवारी कोरोनाचे 27 नवीन रुग्ण; एकाचा मृत्यू

New 27 corona patients in Maval today, 1 death.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (मंगळवारी, दि. 4) कोरोनाचे 27 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 856 झाली आहे. तर दिवसभरात 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 13 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 14 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये माळवाडी, टाकावे बु., गहूंजे येथील प्रत्येकी दोन, तळेगाव दाभाडे ग्रामीण, कामशेत, वराळे, धामणे, सुदुंबरे, शिरगाव, जांभूळ, मळवली ना. मा. येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 5 आणि लोणावळा आणि वडगावमध्ये प्रत्येकी चार रुग्णाची नोंद झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

एकूण 856 रुग्णांमध्ये सध्या 396 रुग्ण सक्रीय आहेत. तर 432 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 274, लोणावळा नगरपरिषद 70 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 54 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 458 रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या रुग्णालयात 212 आणि होम आयसोलेशनमध्ये 184 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.