Nigdi Blood Donate Camp : रक्तदान शिबिरामध्ये 54 पिशव्या रक्त संकलन

एमपीसी न्यूज –  निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती व मंडळाच्या 39 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरला (Nigdi Blood Donate Camp) उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. 54 पिशव्या रक्त संकलन झाले.

सावरकर सदनमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रक्तपेढीच्या सहकार्याने सकाळी 9 ते दुपारी 1.30 या वेळेत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात 54  जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.

Pune News: धर्माबरोबर शिक्षणाचा प्रचार करणे आवश्यक – डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी

दिपक पंडित, सुजित गोरे, कल्याणी धनगर, सुजित दराडे, दिपक नलावडे आदिंनी शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. भास्कर रिकामे यांनी नियोजन केले. तर, मंडळाचे कर्मचारी तसेच सर्व पदाधिकारी यांनी (Nigdi Blood Donate Camp) व्यवस्थापन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.