Nigdi: रिक्षाच्या धडकेत सायकलस्वार जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव रिक्षाने धडक दिल्याने सायकलस्वार ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. यात सायकलचेही नुकसान झाले. ही घटना शनिवारी (दि. 21) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास निगडी येथे घडली.

याप्रकरणी सोमनाथ गुजाबा गायकवाड (वय 35, रा. रुपीनगर, तळवडे, मूळगाव जाकनगाव, ता. खटाव, जि. सातारा) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुजाबा कोंडीबा गायकवाड (वय 60) असे अपघातात जखमी झालेल्या ज्येष्ठ नारिकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमनाथ यांचे वडील गुजाबा हे सायकलवरून घरी जात होते. त्यावेळी भरधाव रिक्षाने त्यांच्या सायकलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात गुजाबा गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रिक्षाचालक अपघातस्थळी न थांबता निघून गेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.