Nigdi News: बीआरटी रस्त्यालगतच्या अनधिकृत पत्राशेडवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ क्षेत्रिय अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने निगडी ते रावेत नवीन पुलाकडे जाणा-या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या मोकळ्या भुखंडाच्या ठिकाणचे बीआरटी रस्त्यालगतच्या अतिक्रमणावर कारवाई केली. 25 अनधिकृत पत्राशेड पाडण्यात आले. ही कारवाई आज (सोमवारी) करण्यात आली.

प्रभाग क्रमांक 15 निगडी सेक्टर नंबर 26 येथील भक्ती-शक्ती चौक निगडी ते रावेत पुलाकडे जाणा-या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या मोकळ्या भुखंडाच्या ठिकाणी बीआरटी रस्त्यालगत अतिक्रमण झाले होते. महापालिकेच्या मोकळ्या जागेवरील पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. 25 अनधिृकत पत्राशेड असे एकूण क्षेत्रफळ अंदाजे 15300 चौरस फुट पाडण्यात आले. या ठिकाणच्या 4 टप-या, 3 हातगाड्यावर कारवाई करुन नेहरुनगर येथील गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले.

क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता संजय भोसले, उपअभियंता विजय भोजने, कनिष्ठ अभियंता रमेश जिंतीकर, अतिक्रमण प्रमुख जयंत मरळीकर, बीट निरीक्षक साहेबराव पवार, इम्रान पठाण, अमित पवार आणि सुरवायझर यांच्या पथकाने केली.

कारवाई दरम्यान 1 पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षक, 15 पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल पथकातील 30 कर्मचारी, 8 मजूर, 3 जेसीबी, 2 क्रेनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.