Nigdi News: पोलीस असल्याची बतावणी करून रोकड पळवली

भाजी विक्री करत रविवारी दुपारी तीन वाजता फिर्यादी त्यांचा टेम्पो घेऊन त्रिवेणीनगर येथील सार्वजनिक रोडवरून जात होते. तिथे त्यांना एका व्यक्तीने अडवले.

एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करून दोघांनी मिळून एका वाहनाला अडवून वाहन चालकाकडून 16 हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. ही घटना रविवारी (दि.23) दुपारी तीन वाजता त्रिवेणीनगर, निगडी येथे घडली.

हरी महादेव शिंदे (वय 31, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे हे ऑनलाइन भाजी विक्री करतात. भाजी विक्री करत रविवारी दुपारी तीन वाजता फिर्यादी त्यांचा टेम्पो घेऊन त्रिवेणीनगर येथील सार्वजनिक रोडवरून जात होते. तिथे त्यांना एका व्यक्तीने अडवले.

पोलीस असल्याची बतावणी करून टेम्पोची तपासणी करण्याचा आरोपीने बहाणा केला. त्यानंतर टेम्पोच्या केबिनमध्ये भाजी विक्रीचे 16 हजार रुपये काढून घेत शिंदे यांची फसवणूक केली. पैसे घेऊन आरोपी त्याच्या दुस-या साथीदारासोबत निघून गेला. याबाबत सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.