Nigdi : फोनवर बोलत जाणाऱ्या पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावला; अनोळखी तिघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – सार्वजनिक रस्त्याने फोनवर बोलत जात असणा-या पादचारी इसमाचा मोपेड दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी चोरट्यांनी मोबाईल फोन हिसकावला. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री साडेनऊच्या सुमारास संभाजीनगर येथे सार्वजनिक रोडवर घडली.

रुपेश रत्नाकर येवला (वय 32, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोपेड दुचाकीवरून आलेल्या अनोळखी तीन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुपेश शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास संभाजीनगर येथील सार्वजनिक रोड वरून मोबाईल फोनवर बोलत जात होते. दरम्यान, त्यांच्या मागच्या बाजूने मोपेड दुचाकीवरुन आलेल्या अनोळखी तीन चोरट्यांनी 50 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.