Nigdi : निगडी, रावेत परिसरातून दोन वाहने चोरट्याने पळविली

संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज – निगडी परिसरातून घरासमोर पार्क केलेली कार, तर रावेत परिसरातून सिलेंडरच्या टाक्यांसह टेम्पो अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत मंगळवारी (दि. 10) संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शशांक कृष्णा नायकल (वय 30, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात कार चोरीला गेल्याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची एम एच 14 / जी एच 8286 ही पाच लाख 30 हजार रुपये किमतीची कार सोमवारी रात्री घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची कार चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

संजय तुकोमान ठाकूर (वय 30, रा. रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात टेम्पो चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा तीनचाकी टेम्पो (एम एच 14 / ए झेड 5785) रावेत येथील डी मार्ट जवळ सोमवारी सायंकाळी सहा ते साडेसहा या कालावधीत पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी टेम्पो तील भरलेले 20 आणि रिकामे चार असे एकूण 24 सिलेंडर आणि टेम्पो चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.