Pune Corona News : पुणेकरांसाठी यंदाची दिवाळी दिलासादायक! दिवाळीत एकही कोरोनाने मृत्यू नाही

एमपीसी न्यूज – पुण्यात गेले दीड वर्ष धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाला या दिवाळीत ब्रेक लागला आहे. लक्ष्मीपूजनासह दिवाळीतील 5 दिवस पुणे शहरात कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी पुणेकरांसाठी दिलासादायक ठरली आहे.

नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या 7 दिवसांपैकी1,2,4,5 आणि 7 नोव्हेंबरला शहरात एकही मृत्यू झाला नाही. याच काळात धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज होती. त्यामुळे पुणेकरांसाठी यंदाची दिवाळी उत्साहात पार पडली. या दिवाळीत 3 नोव्हेंबरला 3 आणि ६ नोव्हेंबरला १ अशा चार रुग्णांचा मृत्यू झाला.

मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु मंगळवारी पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक असून शंभरच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. हे आकडे चिंता वाढवणारे आहेत. कारण गेल्या वर्षी दिवाळी नंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला होता.

गेल्या वर्षी दिवाळीत दररोज 7 ते 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत होता. त्यामुळे गेल्या वर्षीची दिवाळी पुणेकरांची चिंतेत गेली होती. गेल्यावर्षी 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरच्यादरम्यान दिवाळी होती. या काळात 12 नोव्हेंबरला 15. 13 तारखेला 7, 14 तारखेला 12. 15 तारखेला 5 आणि 16 नोव्हेंबरला 4 रुग्णांचा मृत्यू झालेला होता. म्हणजेच गेल्या दिवाळीत कोरोनाच्या एकूण 43 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तसेच दररोज शंभर से दोनशेच्यादरम्यान रुग्णसंख्या वाढत होती. मात्र, या दिवाळीत केवळ दोन दिवसांत चार रुग्णांचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.