Omicron Vaccine Update : महत्त्वाची बातमी! ओमायक्राॅनची सुद्धा लस होणार उपलब्ध, फायझरकडून घोषणा

एमपीसी न्यूज – कोरोनाचा नवा व्हेरीयंट ‘ओमायक्राॅन’वर लवकरच लस उपलब्ध होणार असल्याचे फायझरचे (Pfizer) मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोएर्ला यांनी नुकतंच एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. ओमायक्राॅनच्या या नव्या लसीमुळे जगभरातील बाधित देशांना दिलासा मिळणार हे नक्की!

बोएर्ला म्हणाले, मार्चपर्यंत ओमायक्राॅन व्हेरीयंटवर लस तयार होईल. या लसीची गरज पडेल की नाही, तिचा वापर होईल की नाही हे माहीत नाही, पण तरीही आपण ही लस तयार करत आहोत, असे ते यावेळी म्हणाले.

बोएर्ला पुढे म्हणाले, सध्याच्या कोविड-19 विरूद्ध संरक्षण करण्यासाठी दोन लसींचे डोस आणि बूस्टर डोसमुळे ओमायक्रॉनच्या आरोग्यावरील गंभीर परिणामांपासून संरक्षण मिळाले आहे. परंतु ओमायक्रॉनचा संसर्ग लक्षात घेता आणि त्याचा प्रकार थेट लक्षात घेता, ही कोविडविरोधी लस अशा प्रकारांपासून संरक्षण करेल जे अत्यंत संसर्गजन्य असल्याचे सिद्ध झाले आहे आणि त्यामुळे अनेक सौम्य किंवा क्वचित संक्रमण झाले आहे.

दरम्यान, माॅडर्ना सुद्धा ओमायक्राॅनवर कोविड लस विकसित करत असल्याचे वृत्त आहे. मॉडर्ना कंपनीचे सीईओ स्टीफन बॅन्सल यांनी त्याच वृत्तसंस्थेशी दुसर्‍या मुलाखतीत बोलताना सांगितले की, मॉडर्ना कंपनीही एक बूस्टर डोस विकसित करत आहे, जे ओमायक्रॉन आणि कोविडच्या इतर संभाव्य प्रकारांना रोखण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. 2022 वर्षाच्या शेवटपर्यंत ही लस तयार होईल.

बन्सेल पुढे म्हणाले, 2022 च्या अखेरीस कोविडच्या संभाव्य प्रकारांना सामोरे जाण्यासाठी आणि त्याच्या संभाव्य बूस्टरसाठी सर्वोत्कृष्ट अशी कोणती लस तयार करायची हे ठरवण्यासाठी आम्ही जगभरातील नेत्यांशी चर्चा करून धोरण ठरवत आहोत.

दरम्यान, ओमायक्राॅन जगभरात वेगाने पसरत आहे, मात्र त्याची लक्षणे लहान मुलं आणि तरुणांमध्ये वेगवेगळी दिसून येत आहेत, त्यामुळे या संसर्गाचा धोका आणखी बळावल्याचे चित्र आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.