Bhosari Crime News : दिलेले पैसे मागितले असता धमकी देणा-या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – व्यावसायिक कारणासाठी दिलेले पैसे परत मागितले असता संबंधित पैसे घेणा-या व्यक्तीने पैसे देणा-यास पैसे न देता धमकी दिली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्नील गणपत बालवडकर (रा. बालेवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुनंदा रमेश हजारे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अतिश हजारे आणि आरोपी स्वप्नील याची व्यावसायिक कारणावरून ओळख झाली. त्यांनतर अतिश यांनी आरोपी स्वप्नील यास व्यावसायिक कारणांसाठी पैसे दिले. त्यानंतर अतिश यांनी स्वप्नील यास दिलेले पैसे परत मागितले.

त्यावरून स्वप्नीलने अतिश यांना शिवीगाळ केली. ‘कुणाकडे जायचे त्यांच्याकडे जा. तुमच्याकडे बघून घेतो’ अशी धमकी दिली. याबाबत फिर्यादी यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यानुसार याबाबत भारतीय दंड विधान कलम 504, 506 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.