India Corona Update : 84.62 लाख रुग्णांपैकी 78.19 झाले बरे, रिकव्हरी रेट 92.41 टक्क्यांवर 

एमपीसी न्यूज – देशात मागील 24 तासांत 50 हजार 357 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 84 लाख 62 हजार 081 एवढी झाली आहे. त्यापैकी 78 लाख 19 हजार 887 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. मागील 24 तासांत 53 हजार 920 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.41 टक्क्यांवर पोहोचलं आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 5 लाख 16 हजार 632 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशभरात 577 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1 लाख 25 हजार 562 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशातील कोरोना मृत्यूदर 1.48 टक्के एवढा झाला आहे.
https://twitter.com/ANI/status/1324927586078633985?s=19
देशात आतापर्यंत 11 कोटी 65 लाख 42 हजार 304 नमूणे तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 11 लाख 13 हजार 209 नमूणे शुक्रवारी (दि.6) तपासण्यात आले आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1324928350557646848?s=19
जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असले तरी देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असून जगात सर्वाधिक रिकव्हरी रेट देखील भारताचा आहे. भारतात कोरोना मृत्यूदर दिड टक्क्याच्या खाली आला असून हि सकारात्मक बाब आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.