Residential Spiritual Camp : निवासी अध्यात्मिक शिबिरात 140 बालवारकऱ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज – मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने कान्हेफाटा येथील साईबाबा सेवाधाम येथे आयोजित करण्यात आलेल्या निवासी बालवारकरी (Residential Spiritual Camp) अध्यात्मिक शिबिरात 140 बालवारक-यांनी सहभाग घेतला आहे. हे शिबीर 5 ते 20 मे या कालावधीत होत आहे. शिबिरात हरिपाठ, श्लोक पठण, योगा, गायन, मृदंग आदी प्रकारचे शिक्षण शिकविले जात आहे. या शिबिराला अनेक मान्यवर भेट देऊन आनंद व्यक्त करीत आहेत.

मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्यावतीने निवासी बालवारकरी अध्यात्मिक शिबिर दिनांक 5 मे 2022 ते 20 मे 2022 पर्यंत आयोजित केले असून या शिबिरात आत्तापर्यंत 140 बालवारकरी यांनी सहभाग घेतला.

या शिबिरात मुलांना हरिपाठ, श्लोक पठण,योगा,गायन, मृदंग शिक्षण असे दैनंदिन शिकवले जात आहे. आजच्या  स्वामी निरंजनानंद सरस्वती परमहंस, साईबाबा सेवाधाम प्रकल्प प्रमुख डॉ. स्वाती वेदक, व्यवस्थापक दत्तात्रय चांदगुडे यांनी भेट दिली. मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने श्रीफळ,संत तुकारममहाराज यांची गाथा देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

Yogi Sarkar : उत्तर प्रदेशमध्ये सर्व मदरशाची सुरुवात होणार राष्ट्रगीताने – योगी सरकारचा आदेश

या वेळी मान्यवरांसमोर बालवारकरी (Residential Spiritual Camp) मुलांनी भजन व श्लोक म्हणून दाखवत मान्यवरांना मंत्रमुग्ध केले.

याप्रसंगी मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ अध्यक्ष नंकुमार भसे,सचिव रामदास पडवळ, शिबिराचे अध्यक्ष शांताराम गायखे, उपाध्यक्ष रोहिदास जगदाळे, हभप धोंडीबा घोजगे,सचिव बळवंत येवले,विभाग प्रमुख गणपत पवार,भाऊ रासे, प्रमुख अभिमन्यू शिंदे, दत्तात्रय घोजगे, विनायक कल्हाटकर,अशोक गरवड आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.