PCMC News : आयुक्तांनी ‘नॉनस्टॉप’ चार तास घेतली अधिका-यांची बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज (मंगळवारी) स्थायी समिती, सर्वसाधारण सभा, सारथी हेल्पलाईनचा आढावा, “अर्बन आऊट कम फ्रेमवर्कचा” आढावा यासह विविध विषयांबाबत सलगपणे बैठका घेतल्या. (PCMC News) 1 वाजता सुरु झालेल्या बैठका सायंकाळी पाच वाजता संपल्या. या मॅरेथॉन बैठकांमुळे अधिका-यांची दमछाक झाली. काही अधिका-यांना वेळेवर जेवणही करता आले नाही. सायंकाळी पाच वाजता दुपारचे जेवण केले.

दिवाळीची सुट्टी, अधिका-यांच्या रजा यामुळे गेले आठ दिवस प्रशासकीय कामकाजात मरगळ आली होती. सोमवारीही अनेक अधिकारी सुट्टीवर होते मात्र, आज (मंगळवारी) स्थायी समिती, सर्वसाधारण सभा, सारथी हेल्पलाईनचा आढावा यासह विविध विभागांचा आढावा बैठकीचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आयोजन केले होते.

Engineer day : पुणे विभागात भारतीय रेल्वे सेवा अभियंता दिन साजरा

त्यानुसार दुपारी एक वाजता सुरू झालेल्या बैठकांचे सत्र सायंकाळ सव्वा पाच वाजेपर्यंत सलगपणे सुरू होते. या बैठकांमध्ये आयुक्त सिंह यांनी पुनावळे कचरा डेपोचा प्रश्‍न, भूसंपादनाचे विषय, स्वच्छ सर्वेक्षण, सर्व विभागांच्या विविध कामांचा आढावा घेतला.(PCMC News) सव्वा चार तास सुरू असलेल्या बैठकांचे सत्र सायंकाळी सव्वापाच वाजता संपले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दुपारचे जेवन सायंकाळी साडेपाच वाजता केले. विभागप्रमुखांनी दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यासह विविध सूचना आयुक्तांनी केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.