PCMC News : महापालिका तळवडे गायरान येथे शोभिवंत रोपे तयार करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने तळवडे गायरान गट क्र. 1 येथे शोभिवंत रोपे तयार करून त्यांची  देखभाल करण्यात येणार आहे.(PCMC News) याकामी 47 लाख रुपये खर्च होणार आहेत.

स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या  सुमारे 5 कोटी 78 लाख रुपयांच्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. (PCMC News) या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे,  जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

Movie release : ‘तू फक्त हो म्हण’ चित्रपट 14 ऑक्टोबरला चित्रपटगृहात

महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्ते, उद्याने तसेच मोकळ्या जागी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याठिकाणी लागवडीसाठी सिझनल रोपे पुरविण्याकामी 32 लाख रुपये खर्च होणार आहेत. (PCMC News) ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत निगडी येथील पीएमपीएमएल बस डेपोमध्ये बस चार्जिंगकरीता विद्युत पुरवठा घेण्यासाठी अत्यावश्यक तसेच अनुषंगिक कामे करण्यासाठी 4 कोटी 88 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या विषयांसह विविध विभागांच्या तरतूद वर्गीकरणाच्या  विषयांना प्रशासक  शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत  मान्यता दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.