Chikhali News : तळवडे येथून गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला (Chikhali News) पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 2) दुपारी ज्योतिबानगर, तळवडे येथे करण्यात आली.

जगदीश मगाजी चौधरी (वय 58, रा. संयोगनगर, तळवडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Laxman Jagtap : आमदार लक्ष्मण जगताप यांची उणीव जाणवत राहील – अजित पवार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथील ज्योतिबा चौकात एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांना मिळाली. (Chikhali News) त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून जगदीश चौधरी या व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पांढऱ्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये 197 ग्रॅम वजनाचा 4 हजार 925 रुपये किमतीचा गांजा आढळून आला. पोलिसांनी चौधरी याला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.