Pune : पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होणार

एमपीसी न्यूूज – पेट्रोल दरवाढ सत्र थांबणार असून तब्बल 5 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त मिळणार, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली.

दिवसेंदिवस सतत वाढत जाणा-या इंधन दरवाढीमुळे जनता हैराण झाली होती. त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पेट्रोल अडीच रुपयांनी स्वस्त होणार असल्याची घोषणा केली. तर राज्यशासनाने देखील अडीच रुपयांनी इंधनांचे दर कमी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होणार आहे.   

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.