Pimple Gurav : गाडीला कट लागला म्हणून तरुणावर कोयत्याने जीव घेणे वार एकाला अटक

एमपीसी न्यूज – गाडीला कट लागला म्हणून महिनाभरानंतर(Pimple Gurav) एका तरुणावर कोयत्याने जीव घेणे वार करण्यात आले आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.16) रात्री पिंपळे गुरव येथे घडला.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात प्रेम अनिल कांबळे (वय 18 रा पिंपळे गुरव) यांनी फिर्याद (Pimple Gurav)दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी सोहेल अब्बास शेख (वय 20 रा पिंपळे गुरव) याला अटक केली आहे. तर त्याच्या साथीदार विनोद शिरसाट ऋषी शिंदे अथर्व चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : घरफोडी,दरोडा व  गोळीबार प्रकरणातील सराईताला बेड्या, गुन्हे शाखेची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या गाडीने आरोपीच्या गाडीला एक महिना भरपूर वेळ कट लागला होता याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला पकडून हाताने मारहाण केली. तसेच कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर हातावर व पायावर वार केले.

यावेळी त्यांचे मित्र किरण गायकवाड तेथे होता त्यालाही कोयत्याने मारहाण करण्यात आली. यावेळी आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी आरोपींवर खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे व परिसरात दहशत निर्माण करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपीला अटक केली असून सांगवी पोलीस इतर आरोपींच्या शोधात आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.