Pimpri: शिवाजीनगर येथील महिलेचा कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे, शिवाजीनगर येथील रहिवासी असलेल्या कोरोनाबाधित महिलेचा पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आज (बुधवारी) मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील तीन आणि शहराबाहेरील तीन अशा सहा जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.

पुणे, शिवाजीनगर भागातील महिलेला कोरोनाची लागण झाली होती. या महिलेवर पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरु होते. या महिलेचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे.

दरम्यान, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि  24 एप्रिल रोजी  निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा आणि 6 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा वायसीएम रुग्णालयात अशा सहा जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.