Pimpri Corona Update: शहरात आज अवघ्या 3 रुग्णांची नोंद; कोरोनामुक्त 1 रुग्णाला डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 3 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 1 जणाला डिस्चार्ज देण्यात आला. आजमितीला महापालिका रुग्णालयात एकही रुग्ण उपचारासाठी दाखल नाही.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 59 हजार 322 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या महापालिका हद्दीत 73 सक्रिय रुग्ण असून हे रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. महापालिका रुग्णालयामध्ये एकही रुग्ण दाखल नाही.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 5 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 254 आहेत. आज दिवसभरात 193 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 35 लाख 31 हजार 755 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.