Pimpri Corona Update : शहरात आज 8 नवीन रुग्णांची नोंद, 8 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 8 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 59 हजार 257 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली.

सध्या 72 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 70 रुग्ण गृहविलगीकरणात असून 2 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 5 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 254 आहेत. आज दिवसभरात 2 हजार 262 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 35 लाख 14 हजार 973 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.