Sujata Palande: भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश मीडिया प्रमुखपदी सुजाता पालांडे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज: पिंपरी-चिंचवडमधील संत तुकारामनगरच्या माजी नगरसेविका सुजाता पालांडे यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Sujata Palande) महिला प्रदेशाध्यक्षा तथा विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी पालांडे यांना याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे.

सुजाता पालांडे यांना महिला गणेश मंडळ, महिला बचत गट, महिलांची दही हंडी अशा धार्मिक आणि सांस्कृतीक क्षेत्रात विद्यार्थीदशेपासूनच आवड आहे. (Sujata Palande) उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांच्यामध्ये बाणेदार संघटनकौशल्य आहे. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी ‘चूल आणि मूल’ एवढ्यापुरते मर्यादीत राहिलेल्या महिलांना मुख्य प्रवाहात आणले. त्यांना प्रोत्साहन देऊन स्वावलंबी होण्यासाठी शक्य तेवढी मदत केली. त्यांच्यामुळे संत तुकारामनगरमधील शेकडो महिला या बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी बनल्या आहेत.

Pune News: दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेची रविवारी रंगणार अंतिम फेरी

त्या 2012 ला पहिल्यांदा नगरसेविका झाल्या. सलग दुसऱ्यावेळी 2017 मध्ये त्या निवडून आल्या. त्यांच्यातील सामाजिक चळवळीचे नेतृत्व पाहून पालांडे यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रमुख पदी नियुक्ती केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.