Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने केली दहशतवाद विरोधी शाखेची स्थापना

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलीस आयुक्तालयाने दहशतवाद विरोधी शाखेची स्थापना केली आहे. याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश दिले आहेत.

अधिक माहिती देताना, काकासाहेब डोळे (उपायुक्त परिमंडळ 3) म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी जिल्हा व पोलीस आयुक्तालाय स्तरावर दहशतवाद विरोधी शाखेची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालायासाठी विरोधी शाखेची स्थापना केली आहे. एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व 5 अंमलदार यांची नियुक्ती या शाखेसाठी करण्यात आली आहे.”

Nigdi : …तेव्हाच शैक्षणिक आणि आर्थिक विकासाची सूत्रे सापडतील; परिसंवादात उमटला सूर

सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक राऊत, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शामवीर गायकवाड, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शिरीष देसाई, पोलीस अंमलदार बसवराज धमगुंडे, पोलीस अंमलदार अरुण कुटे व पोलीस अंमलदार सुयोग लांडे यांची या शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. या शाखेचे काम शहरात कोणत्याही भागात सक्रिय असलेल्या राष्ट्रद्रोही घटनाबद्दल माहिती गोळा करणे. मिळालेल्या माहितीचा सखोल अभ्यास करणे. दहशतवाद प्रतिबंधक उपाय योजना प्रभावीपणे राबवणे. राज्यातील अन्य दहशतवाद (Pimpri Chinchwad) विरोधी विभागांशी समन्वय साधून काम करणे, असे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.