Pimpri Chinchwad Police : पोलिसांवर वार करून पळणाऱ्या दरोडेखोरांना 48 तासात अटक

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालायाच्या (Pimpri Chinchwad Police) दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी आरोपीस पकडताना पोलिसांवर वार करून पळून जाणाऱ्या दरोडेखोरांना 48 तासात अटक करून त्यांच्याकडून 9.63 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. 
जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळा याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालायच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने पेट्रोलिंग करून, दरोडा, चैन चोरी, जबरी चोरी, वाहन चोरी या गुन्ह्यास प्रतिबंध करण्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या आदेश व सूचनानप्रमाणे दरोडा विरोधी पथकातीवरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम तांगडे, पथकातील अधिकारी व अंमलदार आयुक्तालाय हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन करत होते.
पोलिस उप निरीक्षक मंगेश भांगे यांना त्यांच्या खास बातमीदारमार्फत बातमी मिळाली, की चिंचवडमधील पडक्या हॉटेल बिस्ट्रॉच्या जागेत काही इसम एका सिल्वर रंगाच्या सँट्रो कार क्रमांक एम एच 43 ए 4755 यामध्ये संशयितरित्या फिरत आहेत व ते त्या परिसरातील रहिवासी नसून त्यांच्या हालचाली संशयस्पद आहेत. या माहितीनुसार तांगडे व भांगे यांनी यांनी एक टीम तयार करून त्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
या कारवाईत तीन इसम हे पोलिस असल्याची चाहूल लागताच गाडी सोडून अंधाराचा फायदा घेऊन झाडीतून पळ काढला. उर्वरित 2 इसमांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. करणसिंग दुधानी (वय 25 वर्षे, रामटेकडी हडपसर) व अनिल टाक (वय 29 वर्षे, रा. ओटा स्कीम निगडी) यांना या कारवाईत 6 जूनला रात्री 10.45 वा. ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्या अंगझडतीमध्ये एक बोर कटर, दोन स्क्रू ड्राइवर, एक कोयता, दोन लोखंडी कटावणी व एक सँट्रो कार असे 2.03 लाख रुपये किंमतीचा माल मिळाला. त्यांच्याकडे चौकशी करता ते घरफोडीसाठी हत्यारे घेऊन वाल्हेकरवाडी येथील पेट्रोल पंपवार दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जात (Pimpri Chinchwad Police) होते.
त्यांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम 399, 402, आर्म ऍक्ट 4(25) व महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37(1) सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या आरोपिंची 15 जूनपर्यंत 9 दिवसांची पोलिस कोठडीची रिमांड घेऊन बारकाईने व सखोल चौकशी केली.
आरोपी करण सिंग दुधानी व त्याचा साथीदार जितसिंग टाक या दोघांनी निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गाडी पळवली. त्यांचा पाठलाग दरोडा विरोध पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व दोन अंमलदार करत असताना सोमाटणे फाटा टोल नाक्याजवळ त्यांनी पोलिसांना प्रतिकार करून गाडी सोडून पळाले. त्याबाबत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम 307, 353, 332, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आले आहेत व 2 सँट्रो कार, 1 मारुती इको कार, सोन्याचे दागिने, 1 मोबाईल फोन, 1 पल्सर मोटरसायकल असा एकूण 7.60 लाख रुपये किमतीचा माल व वरील 2.60 लाख किंमतीचा माल असे एकूण 9.33 लाख रुपये किंमतीचा माल पोलिस कस्टडी दरम्यान (Pimpri Chinchwad Police) जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.