Chinchwad : शहरातील कारवाईचा उच्चांक; शुक्रवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 475 जणांवर कारवाई

0

एमपीसी न्यूज – टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी (दि. 16) शहरातील 475 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पोलिसांनी देखील नियमभंग करणा-यांच्या विरोधातील कारवाई अधिक सक्त केली आहे. शुक्रवारी केलेल्या कारवाईचा आकडा हा आजवरच्या कारवाईचा उच्चांक आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे तसेच नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. नियम न पळणा-यांवर पोलिसांकडून कारवाई करत खटले दाखल केले जात आहेत.

सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचे पालन न करणा-यांवर आर्थिक दंडाची कारवाई केली जात आहे. दंड न भरल्यास थेट गुन्हे दाखल केले जात आहेत.

शुक्रवारी आळंदी, चाकण,तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच म्हाळुंगे चौकी आणि रावेत चौकीच्या हद्दीत एकही कारवाई करण्यात आली नाही. तर वाकड पोलिसांनी तब्बल 161 जणांवर एका दिवसात कारवाई केली आहे.

शुक्रवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (56), भोसरी (25), पिंपरी (63), चिंचवड (10), निगडी (14), आळंदी (0), चाकण (0), दिघी (19), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (37), वाकड (161), हिंजवडी (36), देहूरोड (35), तळेगाव दाभाडे (6), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (9), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (4)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.