गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Pimpri Chinchwad Smart City : स्मार्ट सिटी की खड्डे सिटी? शिवसेनेचा आंदोलनातून प्रशासनाला सवाल

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटीच्या (Pimpri Chinchwad Smart City) दिशेने वेगाने वाटचाल करणा-या पिंपरी-चिंचवड शहरात पावसाळ्यापूर्वी जी परिस्थिती होती, ती परिस्थिती जैसे थे आहे. शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाले असून त्याचा मनस्ताप करदात्या नागरिकांना सहन करावा लागतो. त्या ठिकाणी अपघात होतात तरीही खड्डे बुजविले जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने महापालिकेसमोरील बाजूस स्वखर्चाने सिमेंट व वाळू आणून काँक्रिटीकरण करत रस्त्यावरील खड्डे बुजवून निषेध व्यक्त केला. स्मार्ट सिटी की खड्डे सिटी? असा सवाल प्रशासनाला केला.

महापालिकेच्या बीआरटीएस विभागास वारंवार निदर्शनास आणून पत्रव्यवहार करून देखील अद्याप कारवाई झाली नाही. महापालिकेच्या आवारातच ही परिस्थिती असल्यास शहराचे काय? त्याठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यास व जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल शिवसैनिकांनी (Pimpri Chinchwad Smart City) केला.

Abdul Sattar : मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय, कृषिमंत्री अब्दुल सत्तार स्पष्टच बोलले…

जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, युवासेना शहरप्रमुख विश्वजित बारणे, पिंपरी महिला संघटिका सरिता साने,माजी नगरसेवक निलेश बारणे, जितेंद्र ननावरे, निलेश हाके, माऊली जगताप, किशोर केसवणी, निखिल येवले, बशीर सुतार, राजेंद्र तरस,रोहित माळी, राजेंद्र अडसूळ, विजय साने, शैला निकम, प्रशांत कडलक, रुपेश कदम,अंकुश कोळेकर, उमेश रजपूत, नरेश टेकाडे, शैला पाचपुते, प्रदिप दळवी, सुनील पाटील, निलेश तरस, शुभम चौधरी, तुषार दहीते, मलिक मुजावर, शुभम भदाणे, रुपेश हिरे,पुनम बोराडे, दिपाली चोपडा, आरती जगताप, सुनीता बंगाळे, वैशाली मरगळे, शोभा बंगाळे, हेमचंद्र जावळे राजेंद्र रंधवणे, चिले बी एस केशव सरोदे, चौधरी एस आर, लीलाधर वाणी, प्रकाश शिंगडे उपस्थित आंदोलनात सहभागी झाले होते.

spot_img
Latest news
Related news