Pimpri Chinchwad : झोका घेताना आईसमोर सहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad ) आईच्या डोळ्यासमोर लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पिंपळेगुरव येथील नीता फॅब्रिकेशन या दुकानात काल ही धक्कादायक घटना घडली.

पिंपरी चिंचवड येथे राहणारा चिमुकला युवान दौंडकर (वय 6 वर्ष) याचा मृत्यू झाला आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नीता फॅब्रिकेशनचे गाडी वॉशिंग सेंटर आहे. येथे पिंपळे सौदागर येथे राहणारे युवान आणि त्याची आई आपली दुचाकी सर्व्हिससाठी गेले होते. गाडी सर्व्हिसिंगचे काम सुरु असताना युवान बाजूला खेळत होता. सोबत आई बसली होती.

Pune RTO: स्कूल बसेस,व्हॅनच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरीता शनिवार व रविवारीही कामकाज

त्याचबाजूला एका बेसवर बफिंग करायचे मशीन होते. तेथे युवान झोका खेळायला गेला. आणि झोका घेताना त्याच्या अंगावर बफिंग मशीन पडले. युवान गंभीर जखमी (Pimpri Chinchwad) झाला. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण दुर्दैवाने पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी सांगितले. सध्या लहान मुलांचा अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.