Pimpri Chinchwad theft : पिंपरी-चिंचवड शहरात चोरीच्या आठ घटना उघडकीस

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad theft) शहरात चोरीचे आठ गुन्हे शुक्रवारी (दि. 20 मे) दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सहा दुचाकी, एक इको गाडी आणि केबल वायर असा एकूण दोन लाख 60 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

दत्तवाडी आकुर्डी येथून 80 हजार रुपये किंमतीची एक इको कार चोरीला गेली आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव येथून शेतातील खोलीतून अज्ञात चोरट्यांनी 40 हजार रुपये किंमतीची 600 फूट लांब केबल वायर चोरून नेली. या प्रकरणी शिरगाव चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : लालमहलात लावणी नृत्य, कठोर कारवाई करण्याची भाजपची मागणी

चाकण, चिखली, हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून (Pimpri Chinchwad theft) सहा दुचाकी चोरीला गेल्या आहेत. चाकणमधून 20 हजारांची एक, चिखली मधून अनुक्रमे 20 हजार, 30 हजार, 20 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. तर, हिंजवडी मधून 30 हजार आणि वाकड मधून 20 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे. पोलिस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.