Pimpri Corona Update: शहरात आज 108 नवीन रुग्णांची नोंद, 121 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 108 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 121 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 2 रुग्णांचा आज मृत्यू झाला असून आजपर्यंत शहरातील 4 हजार 466 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 2 लाख 75 हजार 69 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 854 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 532 रुग्ण गृहविलगीकरणात असून 322 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 41 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 360 आहेत. आज दिवसभरात 9 हजार 195 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 21 लाख 17 हजार 142 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.