Pimpri Corona Update: शहरात 1405 सक्रिय रुग्ण! आज 173 नवीन रुग्णांची नोंद

116 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 173 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 116 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजमितीला शहरात 1 हजार 405 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 2 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 393 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 69 हजार 2 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 405 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 824 रुग्ण गृहविलगीकरणात असून 581 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 36 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 394 आहेत. आज दिवसभरात 8 हजार 549 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 13 लाख 87 हजार 500 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.