Pimpri Corona Update : शहरात आज 181 नवीन रुग्णांची नोंद; 137 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 181 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 137 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात आजमितीला एकूण 921 सक्रिय रुग्ण आहेत.

शहरातील 2 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 4 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 373 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 67 हजार 55 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 921 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 229 रुग्ण गृहविलगीकरणात असून 692 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 51 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 456 आहेत. आज दिवसभरात 7 हजार 339 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 12 लाख 8 हजार 684 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.