Pimpri Corona Update: शहरात आज नवीन 2 हजार 545 रुग्णांची नोंद, 1 हजार 73 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 545 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 1 हजार 73 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 529 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 97 हजार 368 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 13 हजार 986 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 13 हजार 490 रुग्ण गृहविलगीकरणात असून 496 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 106 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 496 आहेत. आज दिवसभरात 8 हजार 679 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 31 लाख 55 हजार 725 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.